मराठी साहित्य सम्मेलनाचा अखिल भारतीय तमाशा
आपले तथाकथित अखिल भारतीय मराठी साहित्यसम्मेलन परंपरेप्रमाणे आपला घरंदाज घाटीपणा सिद्ध करून गेले. माय मराठी, माझा मऱ्हाटीची बोलू कवतुके, लाभले भाग्य आम्हा, मराठी माणूस, अणूरेणू या तोकडा, मराठी वर्ष, मराठी अस्मिता….. अशा नानाविध अस्मितादर्शी पताका आम्ही रोवल्या आहेत. हे आम्ही पांघरलेलं वाघाचं कातडं, साहित्यसम्मेलनात आपोआप गळून पडतं. साहित्यसम्मेलन आलं की गर्दी जमवण्यासाठी आम्हाला कुणी चिंटू …